loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर गावाने मारली बाजी; डिजिटल पीक पाहणी सर्वेक्षण १००% पूर्ण करणारे ठरले पहिले गाव!

देवरुख: केंद्र शासनाच्या 'डिजिटल क्रॉप सर्व्हे' (DCS MH) मोबाईल अॅपद्वारे खरीप हंगाम २०२६-२७ करिता सुरू असलेल्या पीक पाहणी मोहिमेत संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर या गावाने आपले सर्व्हे पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२७ करीता केंद्र शासनाच्या Digital Crop Survey (DCS MH) मोबाईल ॲपद्वारे ११ ऑगस्ट २०२६ ते १० नोव्हेंबर २०२६ या निर्धारीत कालावधीत १००% पीक नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत सर्व गट क्रमांक व सर्वे क्रमांकनिहाय प्रत्यक्ष पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून Crop Registry अद्ययावत केली जात आहे. या डिजिटल पीक नोंदणीच्या माहितीचा उपयोग विविध कृषी योजना, पीकविमा भरपाई, आपत्ती व्यवस्थापन मदत, कृषी सांख्यिकी तसेच AgriStack प्रकल्पांतर्गत महत्त्वपूर्ण कामांसाठी केला जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर, मुरादपूर गावामध्ये एकूण १२८२ सर्व्हे प्लॉट असून, येथील अडचणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचून पीक पाहणी सहायक श्री. प्रथमेश गांगण (महसूल सेवक) अत्यंत समर्पित भावनेने हे काम पूर्ण केले आहे. या उल्लेखनीय यशात जयश्री पाटील - ग्राम महसूल अधिकारी, रोहीत पाठक मंडळ अधिकारी देवरुख यांचे मोलाचे व प्रशंसनीय योगदान लाभले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg