loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी सैनिकांच्या समस्यांसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम सरसावले; दर तीन महिन्यांनी योजनांचा आढावा घेणार

जामगे, खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने खेड तालुक्यातील जामगे येथील छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूलमध्ये माजी सैनिकांचा मेळावा उत्साहात पार पडला. सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या मेळाव्याला गृहराज्यमंत्री योगेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, माजी सैनिकांनी देशासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना राबवित आहे. मात्र या योजनांचा लाभ प्रत्येक माजी सैनिकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय विभागांमध्ये समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व त्यांच्या समस्या तात्काळ सुटाव्यात यासाठी दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा त्यांनी यावेळी केली. शासकीय योजनांसाठी विविध विभागांनी एकत्र येऊन काम केल्यास माजी सैनिकांचे प्रश्न जलद गतीने सुटतील, असेही त्यांनी अधोरेखित केले. शासन माजी सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळण्याची व शासकीय योजनांचा लाभ अधिक गतीने मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg