रत्नागिरी, : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये खासगी रुग्णालयांत लाखो रुपये खर्चून केली जाणारी अत्याधुनिक 'एसीएल लिगामेंट' (ACL Ligament) शस्त्रक्रिया येथील शासकीय रुग्णालयात अत्यंत यशस्वीपणे आणि पूर्णपणे मोफत पार पडली. या यशस्वी उपचारांमुळे सर्वसामान्य व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. कराड येथील रहिवासी पांडुरंग सोपान काशीद (वय ३८) यांना दोन महिन्यांपूर्वी पायाला गंभीर दुखापत झाली होती.
या दुखापतीमुळे त्यांच्या उजव्या गुडघ्याची 'एसीएल लिगामेंट' ही अत्यंत महत्त्वाची शीर तुटली होती. त्यामुळे तीव्र वेदना, चालताना पाय लचकणे आणि पायऱ्या चढ-उतार करताना त्यांना असह्य त्रास सहन करावा लागत होता. सुरुवातीला त्यांनी बाहेरगावी उपचार घेतले, मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर त्यांनी रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल देवकर यांच्याशी संपर्क साधला. डॉ. देवकर यांनी तपासणीअंती दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (Arthroscopic ACL Ligament Reconstruction) करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २९ सप्टेंबर रोजी ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान गुडघ्यातील तुटलेल्या लिगामेंटच्या जागी नवीन शीर प्रत्यारोपित करण्यात आली.
खासगी रुग्णालयांमध्ये लाखोंच्या घरात खर्च येणारी ही शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत झाल्याने रुग्ण पांडुरंग काशीद यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल देवकर, डॉ. हर्षल, भूलतज्ज्ञ डॉ. जमशेर व डॉ. ऐश्वर्या, परिचारक सिद्धेश पालकर आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या यशाबद्दल शासकीय रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.