loader
Breaking News
Breaking News
Foto

चोरीस गेलेला ब्रेकर पुणे येथून हस्तगत करण्यात साखरपा पोलिसांना यश

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील कळकदारा खाडिकोळवण रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम सुरु असून रस्त्याच्या कामासाठी असलेला चार लाखाचा ब्रेकर १२ नोव्हेनंबरला अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. या बाबतची तक्रार १५ तारखेला साखरपा पोलिस दूर क्षेत्रात देण्यात आली होती. या कामी साखरपा पोलिसांनी चोरीस गेलेल्या ब्रेकरच्या चोरीचा छडा काही दिवसात लावून ब्रेकर घेणारा व ब्रेकर सोनसांगवी पुणे येथून ताब्यात घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार विकास राय वय २५ याने भाड्याची पिकअप गाडी करून चार लाख किंमतीचा ब्रेकर सोन सांगवी पुणे येथे नेऊन विकला. मोबाईल सिडिआर द्वारे माहिती घेता आरोपी विकास राय हा मुलगावी बिहार येथे असल्याचे समजते. तर चोरीस गेलेला ब्रेकर व विकत घेणारा अरविंद यादव वय सु. २१ सोन सांगवी पुणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव तपास करीत आहे. मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg