वैभववाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) एकात्मिक शेती समूह (IFC) उपक्रमांतर्गत सांगुळवाडी येथे रमाई स्वयंसहायता समूहाचे शेतीमाल संकलन केंद्र सुरू करण्यात आले. सोमवारी (ता. २३) वैभववाडी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमासाठी बचत गटाला एक लाख रुपयांचे कर्जस्वरूपात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. लोरे नं. २ येथील सह्याद्री महिला प्रभागसंघ आणि सांगुळवाडी येथील भरारी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिला शेतकरी, शेतकरी गट, उत्पादक गट आणि शेतकरी कुटुंबांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाचे एकाच ठिकाणी संकलन, वर्गीकरण, प्रतवारी, वजन, पॅकिंग, साठवणूक आणि बाजारपेठेपर्यंत विक्री व्यवस्थापन करणे, ही या केंद्राची संकल्पना आहे.
या केंद्राच्या माध्यमातून काजू बोंड व काजूगर, आंबा, कोकम, फणस, नाचणी तसेच इतर भरडधान्यांचे संकलन केले जाणार आहे. आंब्याचे संकलन व प्रतवारी, कोकम फळांचे संकलन करून प्रक्रिया उद्योगांना पुरवठा, फणसाचे संकलन व प्रक्रिया तसेच काजू बोंड व काजूगर संकलनावर भर दिला जाणार आहे. याशिवाय महिला उत्पादक गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्रीही या केंद्राच्या माध्यमातून केली जाणार आहे. केंद्राच्या कामकाजासाठी ३०० किलो क्षमतेचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, बॅग सीलिंग मशीन, पॅकिंग साहित्य, प्लास्टिक क्रेट्स, गोणपाटाच्या पिशव्या, ताडपत्री तसेच धान्य व काजूतील आर्द्रता तपासण्यासाठी मीटर यांसारख्या साहित्याची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदीसाठी ४५ हजार रुपये खेळते भांडवल म्हणून ठेवण्यात आले असून, वाहतूक व विक्री व्यवस्थेसाठीही स्वतंत्र तरतूद आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित मालासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. एकत्रित संकलन व विक्री व्यवस्थेमुळे शेतीमालाची बाजारपेठेपर्यंत पोहोच सुलभ होण्यास मदत होणार आहे. तसेच महिला बचत गटाला व्यवसाय व्यवस्थापनाचा अनुभव मिळून आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी मंगेश लोके यांनी महिला बचत गटाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. महिलांनी एकत्रित प्रयत्नांतून कृषिपूरक व्यवसायांचा विस्तार करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक गुरुप्रसाद तेंडोलकर, ब्लॉक अँकर अनिकेत कदम, सह्याद्री महिला प्रभागसंघाच्या अध्यक्षा उमा मंगेश कदम, सचिव शिल्पा शंकर सुतार, कोषाध्यक्ष पूजा पंढरी रावराणे, भरारी ग्रामसंघाच्या अध्यक्षा सुरेखा सुरेश गुरव, सचिव संजना सत्यवान सुतार, रमाई स्वयंसहायता समूहाच्या अध्यक्षा दीपिका दीपक जाधव, सचिव स्वाती सचिन जाधव, कोषाध्यक्ष श्वेता सुधीर जाधव, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान सुतार, ग्रामसेवक विद्याधर सावंत, ग्रामसखी शमा सुतार, प्रभागसंघ लिपिका सुप्रिया रावराणे तसेच रमाई स्वयंसहायता समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.