loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका नवरात्र उत्सव संघटनेची सभा संपन्न, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांचे मार्गदर्शन

गुहागर (उमेश शिंदे) - गुहागर तालुका नवरात्र उत्सव संघटनेची महत्त्वपूर्ण सभा नुकतीच संपन्न झाली. येणाऱ्या नवरात्र उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था, मंडळांनी घ्यावयाची काळजी आणि परवानग्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गुहागरचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर हे या सभेला उपस्थित होते. त्यांनी सर्व मंडळांना शांततेत आणि नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सभेच्या व्यासपीठावर नवरात्र उत्सव समितीचे तालुका अध्यक्ष उमेश शिंदे, उपाध्यक्ष मनोज कोळवणकर, पोलीस पाटील विशाल बेलवलकर, पत्रकार दिनेश चव्हाण, मयुरेश कोळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवरात्र उत्सव काळातील नियोजन, आणि मिरवणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

या बैठकीला तालुक्यातील विविध नवरात्र उत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासन आणि उत्सव समिती यांनी समन्वयाने काम करून यंदाचा नवरात्र उत्सव उत्साहात आणि सुरक्षितपणे पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg