loader
Breaking News
Breaking News
Foto

‘हा निसर्गाचा कोप; सर्वांनी एकजुटीने दुष्काळाचा सामना करूया’ – आमदार प्रमोद जठार

राजापूर - राजापूर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रमोद जठार यांनी तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी तहसीलदार विकास गंबरे यांच्याकडून तालुक्यातील पाणी उपलब्धता, संभाव्य पाणीटंचाई आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती घेतली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी तालुक्याचा सविस्तर पाणीटंचाई आराखडा तातडीने तयार करावा, अशा सूचना आमदार जठार यांनी दिल्या. तसेच उपलब्ध धरणातील पाण्याचा काटेकोर व योग्य पद्धतीने वापर कसा करता येईल, याचे नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाणीटंचाईच्या काळात विंधन विहिरी, धरणांचे कालवे आणि उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करण्याबाबतही त्यांनी प्रशासनाशी चर्चा केली. गावनिहाय पाण्याची गरज आणि उपलब्धता याचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला. “हा निसर्गाचा कोप आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एकजुटीने सामोरे जाण्याची गरज आहे. दुष्काळाच्या प्रश्नात राजकारण किंवा पक्ष आणू नका. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे आवाहन आमदार जठार यांनी केले. तसेच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थितीचा आढावा घ्यावा, नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्या प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, राजापूर तालुक्यातील पाणीटंचाईची संभाव्य तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन, पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना आणि आवश्यक ठिकाणी पर्यायी स्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यावेळी अभिजित गुरव-उपसभापती राजापूर, एकनाथ मोंडे मंडल अध्यक्ष राजापूर पूर्व,मोहन घुमे मंडल अध्यक्ष राजापूर पश्चिम, अमोल सिनकर सरचिटणीस, सुरेश गुरव, फारुख साखरकर,प्रल्हाद तावडे, चंद्रकांत लिंगायत, काशिनाथ पाटील,संतोष धुरत भूषण सावंत अजय लाड,सुयोगा जठार नगरसेविका राजापूर, पटेल मॅडम, मारुती कांबळे, सुधा चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg