loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील पहिले नाचणी खरेदी केंद्र वैभववाडीत सुरू होणार; प्रमोद रावराणे यांची माहिती

वैभववाडी (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील जमीन नाचणी लागवडीसाठी पोषक आहे. इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्च व कमी श्रमात चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे कोकणातील पहिले नाचणी खरेदी केंद्र वैभववाडीत सुरू करण्यात येणार आहे. यंदापासून खरेदीला सुरवात करण्यात येणार असल्याचे माहिती पणन महामंडळाचे संचालक आणि तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ​यावेळी संघाचे व्यवस्थापक सिद्धेश रावणे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रमोद रावराणे म्हणाले, "तालुका खरेदी-विक्री संघातर्फे दरवर्षी भातखरेदी केली जाते. यंदापासून नाचणीदेखील खरेदी केली जाणार आहे. कोकणातील पहिले नाचणी खरेदी केंद्र वैभववाडीत सुरू होईल. त्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून पणन महामंडळाकडून लवकरच केंद्राला मंजुरी मिळणार आहे. नाचणीला शासकीय आधारभूत किंमत प्रतिक्विंटल 5205 रुपये आहे. वैभववाडी तालुक्यातील नाचणी उत्पादकांसह जिल्ह्यातील सर्व नाचणी उत्पादक या केंद्रावर नाचणी विक्री करू शकतात. केंद्र मंजुरीसाठी पालकमंत्री नीतेश राणे यांनी पाठपुरावा केला आहे."

टाईम्स स्पेशल

ते म्हणाले, "जिल्ह्यातील वातावरण नाचणीसाठी पोषक आहे. अन्य पिकांच्या तुलनेत नाचणी खर्च व श्रम कमी आहेत. त्यामुळे पुढील वर्षी अधिकाधिक शेतकऱ्यांनी नाचणीचे उत्पादन घ्यावे." ​ते म्हणाले, "यंदा भात उत्पादन कमी आहे. भात दरात शासनाने ८१ पैसे वाढ केली असून प्रतिक्विंटल दोन हजार ४४१ रुपये दर आहे. भात उत्पादकांनी ११ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी वेळेत व्हावी, यासाठी खरेदी-विक्री संघाचे संचालक २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत गावोगावी ग्रामपंचायत व सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg