loader
Breaking News
Breaking News
Foto

कळकवणे शाळेत महात्मा गांधी - लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळकवणे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना सत्य, अहिंसा, साधेपणा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशसेवेचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी शिक्षणप्रेमी तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद केंद्र शाळा देव्हारेचे माजी मुख्याध्यापक मोतीलाल पाटील यांनीही दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोहार व खाऊ वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg