loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण येथील विजयकुमार जोशी यांना इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड जाहीर

नाशिक : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड या पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून यात चिपळूण, जि. रत्नागिरी येथील विजयकुमार धोंडदेव जोशी यांच्या संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेवून त्यांना इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 10 जानेवारी 2027 रोजी दुपारी 2.30 वाजता आय.एम.आर.टी. कॉलेज सभागृह, मॅरेथॉन चौक, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा कार्यक्रम अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये विजयकुमार जोशी यांचा समावेश असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे. इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड या पुरस्कार समारंभाच्या अधिक माहितीसाठी मो. क्र. 9422772021/2020 या नंबरवर संपर्क साधावा.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg