loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री जनता विद्यालय तळवडेच्या मुलींची तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावंतवाडी : तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत श्री जनता विद्यालय तळवडेच्या मुलींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचे १४ व १७ वर्षांखालील मुलींचे दोन्ही संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असून, ते आता सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय व सावंतवाडी तालुका व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १४ वर्षांखालील गटातील स्पर्धा १२ सप्टेंबर रोजी कळसूळकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे पार पडली. या स्पर्धेत श्री जनता विद्यालय तळवडेच्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात विजेतेपद मिळवत प्रथम क्रमांक पटकावला या विजयी संघात आराध्या तळवडेकर, समृद्धी आचरेकर, रुद्रा चौगुले, दिशा गावडे, खुशी नाईक, कीर्ती पेडणेकर, काव्या अमरे, इंद्रायणी रेडकर, आर्या नाईक, आरोही शिरोडकर व स्वरा सातार्डेकर यांनी सहभाग घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच १७ वर्षांखालील गटाची स्पर्धा २६ सप्टेंबर रोजी श्री जनता विद्यालय तळवडे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतही विद्यालयाच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या संघात आर्या पावणोजी, आरुषी सावंत, अनुष्का कुंभार, साक्षी पेडणेकर, श्रुती जाधव, श्रावणी दळवी, वैष्णवी जाधव, मालविका गावडे, आर्या मांजरेकर, सानवी पावणोजी , शमिका परब ,आर्या सावंत यांनी सहभाग घेतला होता. या दोन्ही विजयी संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ते सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

टाईम्स स्पेशल

या यशासाठी विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दयांनद बांगर, विजय सोनवणे व शांताराम गवई यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg