चिपळूण (ओंकार रेळेकर) - कोळकेवाडीच्या धरणातून ग्रॅव्हिटीने येणारी पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी चिपळूण नगरपरिषदेवर स्वतःच्या ठेवी मोडण्याची वेळ आल्याने अस्वस्थ झालेल्या आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी आज चिपळूण येथे महत्वाची बैठक घेतली. कोळकेवाडी धरण व्यवस्थापन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, नगरपरिषद आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत योजनेच्या नेमक्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नागरोत्थान योजनेमधून २०२४ मध्ये मंजूर झालेली कोळकेवाडीच्या धरणातून ग्रॅव्हिटीने येणारी पाणी योजना १५२ कोटी रुपयांची होती, मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत केवळ ४५ कोटी रुपयेच शासनाकडून नगरपरिषदेस प्राप्त झाले असून सुमारे तेवढ्याच किमतीचे काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे. राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, चिपळूण शहराला आजपर्यंत कोयनेचे अवजलातून पाणी प्राप्त होत असून त्यामुळेच दोन वेळचा पाणीपुरवठा हा शक्य होत आहे, मात्र भविष्याचा धोका लक्षात घेता ग्रॅव्हिटीने कोळकेवाडीतून थेट पाणी येणे हे शहरासाठी अत्यंत आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वी चिपळूण नगरपरिषदेची कौन्सिलची सभा झाली व त्यामध्ये नगरपरिषदेकडे असलेल्या ठेवींमधून पाच कोटी रुपये खर्च करण्याचे ठरल्याचे आमदार भास्करराव जाधव यांना समजले. ज्या शहरामध्ये आपली जडणघडण झाली त्या शहराचे आपण देणं लागतो ही भावना असल्यामुळे त्यांनी यात लक्ष घालण्याचे ठरविले, ते स्वतः नगर विकास राज्यमंत्री असताना जरी चिपळूण शहर हे त्यांच्या मतदारसंघात येत नसलं तरी कोट्यावधीचा निधी त्यांनी त्यावेळेला चिपळूण शहरासाठी देऊ केला होता. आपण स्वतः जरी विरोधी पक्षात असलो तरी संसदीय आयुधाचा वापर करून आपल्या या शहराला त्याचा कसा फायदा करून देता येईल यासाठी आमदार जाधव हे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळेच ज्या वेळेला नगरपरिषदेवर स्वतःच्या ठेवी मोडण्याची वेळ येते अशा वेळेला ते अत्यंत अस्वस्थ झाले आणि म्हणूनच आज दि. १८ रोजी त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये एक अत्यंत महत्त्वाची अशी बैठक आयोजित केली. या बैठकीला कोळकेवाडी धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता महेश रासणकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता योगेश नंजाप्पा, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित कांबळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह या योजनेशी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी तसेच नगरसेवक फैसल कास्कर, मिथिलेश उर्फ विकी नरळकर, कांचन शिंदे, अजय भालेकर आदी उपस्थित होते.
आमदार जाधव यांनी आपल्या कार्यशैलीनुसार उपस्थित असलेल्या अधिकार्यांकडून या योजनेचा इतिहास समजून घेतला, यामध्ये कोयना सिंचन विभाग, चिपळूण नगरपरिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचं एकमत नसल्याचे त्यांच्या लक्षात आलं. अशा वेळेला तिन्ही खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांमध्ये समन्वय घडवून आणून ही योजना मार्गी लावणं माझ्यासाठी अवघड नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. चिपळूण तालुका हा डोंगरी विकासमध्ये समाविष्ट असलेला तालुका असल्याने १० टक्के लोकवर्गणी भरण्याची आवश्यकता नव्हती, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या योजनेची सद्यस्थिती समजून घेत असताना ज्यावेळेला ही योजना प्रत्यक्ष मंजूर झाली होती त्या वेळेला याच शहराच्या योजनेमध्ये २७ गाव जोडली जावीत यासाठी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे त्यांनीच पाठपुरावा केला होता व त्यासाठी सुमारे १०० कोटींचा निधी मंजूर करून घेण्यात त्यांना यशही आले होते. आजच्या बैठकीत त्याचाही आढावा त्यांनी अधिकार्यांकडून घेतला.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.