loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीशैल्य पुजारी यांना "राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक " पुरस्कार जाहीर

देऊड - करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, देऊड येथील मुख्याध्यापक श्रीशैल्य रामचंद्र पुजारी यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्यावतीने प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक’ पुरस्कार जाहीर झाला. आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे देऊड हायस्कूलच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव झाला असून संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येत्या १३ व १४ नोव्हें २०२६ पालघर येथील राज्यस्तरीय मुख्याध्यापक महामंडळ अधिवेशनात त्यांना सन्मानपूर्व प्रदान करण्यात येईल. श्रीशैल्य पुजारी हे सन २००५ पासून श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, देऊड येथे कायम मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विद्यालयाच्या शैक्षणिक, भौतिक व सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीबरोबरच शिस्त, संस्कार, शैक्षणिक उपक्रम आणि विद्यालयाच्या विकासाला त्यांनी प्राधान्य दिले.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे विद्यालयाच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली. या संपूर्ण प्रवासात त्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शशिकांत भागोजी नलावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले. संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या सहकार्याच्या बळावर त्यांनी विद्यालयाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg