loader
Breaking News
Breaking News
Foto

गोव्याहून ५०० हून अधिक भाविक ‘वसुंधरा पायी दिंडी’नें नाणीजधामच्या दिशेने रवाना, रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून ग्लोबल वॉर्मिंगविषयी जनजागृती

ओल्ड गोवा : जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पावन प्रेरणेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी ओल्ड गोवा येथून गोवेश्वर महाशिव मंदिरातून शनिवारी (१० ऑक्टोबर) ‘वसुंधरा पायी दिंडी’ श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने रवाना झाली. या दिंडीत ५०० हून अधिक धामयात्री सहभागी झाले आहेत. पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे फलक, ध्वज आणि घोषवाक्ये असलेले पोशाख परिधान करून धामयात्री या पदयात्रेत सहभागी झाले. प्रस्थान सोहळ्याला गोवा राज्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक, आमदार राजेश फळदेसाई यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. त्यांनी दिंडीतील सहभागी धामयात्रींना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर दक्षिण गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, पंचायत सदस्य सिद्धेश नाईक आणि ओल्ड गोव्याच्या सरपंच सौ. मेधा मेघश्याम पर्वतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ओल्ड गोवा उपपीठातून निघालेली ही दिंडी सुमारे ११ दिवसांचा प्रवास करून २१ ऑक्टोबर रोजी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे पोहोचणार आहे. प्रवासादरम्यान विविध गावांमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन, वृक्षांचे महत्त्व आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. नागपूर, तेलंगणा, मराठवाडा, नाशिक, मुंबई, पुणे आणि गोवा या सात उपपीठांतून ‘वसुंधरा पायी दिंडी’ नाणीजधामच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कडक उन्हाची तमा न बाळगता धामयात्री पायी प्रवास करत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg