संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - दिव्यांग विद्यार्थ्यांना समाज जीवनात समान संधी, स्वावलंबन आणि सन्मानाने जगता यावे, यासाठी दिले जाणारे पद्धतशीर सहाय्य व मार्गदर्शन, तसेच कल्याणकारी उपक्रम, आरोग्य वैद्यकीय उपचार, सहाय्यक साधने व उपकरणे, शिक्षण व कौशल्य विकास, शासकीय योजनांचा लाभ, भावनिक व मानसिक आधार, त्यातून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धीर देऊन समाजात सन्मानाची वागणूक मिळवून देऊन भेदभाव दूर करणे अशा विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मुख्य प्रवाहात आणणे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी कमी करून स्वावलंबी बनविणे तसेच पायाभूत सुविधा मिळवून देणे,अशा अनेक हेतूंसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष शिक्षक गेली १४ ते १८ वर्षे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खेड्यातून तळमळीने उल्लेखनीय सेवा बजावत असून ही बाब अत्यंत अभिमानाची असल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचा सन्मान सोहळा २०२६/२७ चा नुकताच रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये संपन्न झाला.
सदरचा सोहळा अस्मिता केंद्रे अध्यक्ष जि. प. रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वैदेही रानडे (भाप्रसे)मुख्य कार्यकारी अधिकारी जि,प. रत्नागिरी, विलास चाळके उपाध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती जि.प. रत्नागिरी महेश नाटेकर सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती, सुयोग कांबळे सभापती समाज कल्याण समिती, मयुरी शिर्के सभापती महिला व बालकल्याण समिती तसेच किरण लोहार शिक्षणाधिकारी ( योजना) दीपक मेंगाने शिक्षणाधिकारी माध्यमिक, मनिषा जगदाळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व नंदकुमार मुरकर क्रीडा,शिक्षण,व वित्त सभापती यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत प्रत्येक विशेष शिक्षकांना सन्मान पत्राद्वारे गौरवण्यात आले.
यामध्ये मंडणगड २, दापोली ५ खेड५,गुहागर ३, चिपळूण ७ संगमेश्वर ५ रत्नागिरी ९ लांजा ४ व राजापूर ४ एकूण ४४ विशेष शिक्षकांना सन्मान पत्राने गौरवण्यात आले. यापैकीं संगमेश्वर तालुक्यातील सानिका भितले यांचे गेल्या दोन महिन्यांपूर्वी निधन झाल्याने त्यांचा भाऊ रामकृष्ण माईन हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सन्मानित केलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन सेवा कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विशेष शिक्षकांमधून अश्विनी चव्हाण,ज्ञानेश्वर गुरव, अश्विनी मोहिते यांनी मनोगत व्यक्त करून जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी यांना सन्मान सोहळ्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रास्ताविक सूर्यवंशी उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी केले तर सूत्रसंचालन गावंड शिक्षण वि.अधि.(प्राथ.) यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन शांतेश्वर ढवळे जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण यांनी केले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.