loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोंदा-जाधववाडी नळपाणी योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित

बांदा (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत आरोंदा येथील जाधववाडी नळपाणी योजनेचे ग्रामपंचायतीकडे जल अर्पण कार्यक्रमातून हस्तांतरण करण्यात आले. तसेच दुष्काळ निवारण व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलतारा कार्यक्रमांचे उद्घाटनही करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली, उपाध्यक्ष दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुश्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर कवठणकर, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सुदेश राणे, गटविकास अधिकारी निलेश जाधव, प्रशासक ग्रामपंचायत आरोंदा शुभदा कविटकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रमोद कामत यांनी जाधववाडी योजनेच्या हस्तांतरणामुळे ग्रामस्थांना शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे सांगितले. योजनेची नियमित देखभाल, दुरुस्ती व योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.

टाईम्स स्पेशल

दादा साईल यांनी शुद्ध व सुरक्षित पाणी ही नागरिकांच्या आरोग्याशी निगडित अत्यावश्यक बाब असून, प्रत्येक कुटुंबाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व जाधववाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg