loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शताब्दी महोत्सवानिमित्त खेडमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेड (प्रतिनिधी) - शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त शिवसेना नेते रामदासभाई कदम व गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाने खेड नगरपरिषदेचे नगरसेवक मिनार उल्हास चिखले यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, खेड येथे झालेल्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, कंपास व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कार्यक्रमास खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवीताई राजेश बुटाला, सहजीवन शिक्षण संस्थेचे विश्वस्त व नगरसेवक संजय मोदी, शिवसेना महिला आघाडी संघटिका नेहाताई दळी, खेड नगर परिषदेचे शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक मिनार चिखले, नगरसेवक प्रेमल चिखले, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर तसेच श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg