loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा येथे २८.८० लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एकाला अटक

बांदा (प्रतिनिधी) - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्याच्या पथकाने मंगळवारी (२४ नोव्हेंबर) रात्री मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा सर्व्हिस रोडवर मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारे चारचाकी वाहन पकडले. या कारवाईत २८ लाख ८० हजार रुपये किमतीचा मद्यसाठा आणि १० लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण ३८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित प्रमोद अशोक निर्मळ (२७, रा. निर्मळ मळा, यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बांदा येथील साळगर चहा दुकानासमोर २४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे २४० बॉक्स (१०,०५० बाटल्या) आढळून आले. आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त स्नेहलता नरवणे आणि अधीक्षक कीर्ती शेंडो यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, मिलिंद माळी, जवान दीपक वायंगडे, संदीप कदम, वाहनचालक जवान सागर सूर्यवंशी, जवान सतीश चोगुले व अभिषेक खनी यांनी कारवाईत सहभाग घेतला. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg