loader
Breaking News
Breaking News
Foto

लोवले व नवनिर्माण कॉलेज येथील धोकादायक वळणावर खड्ड्यांचे साम्राज्य; तसेच विद्यार्थ्यांसह प्रवाशांना अपघाताचा धोका

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर-कोल्हापूर राज्य मार्गावरील लोवले गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी असलेली मोरी आणि तिच्या परिसरातील रस्त्याची अवस्था खराब झाली असून, खड्डे चुकवून वाहन चालवताना समोरून येणार्‍या वाहनांना धडक बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र, लोवले येथील या वळणावर रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी अडथळा ठरत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खड्डे चुकवण्यासाठी वाहनचालकांना आपली वाहने रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला घ्यावी लागत आहेत. त्यामुळे समोरून येणार्‍या वाहनांशी धडक होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः वळणावरून समोरून येणारे वाहन वेळीच दिसत नसल्याने अचानक समोरासमोर वाहने येण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. यापूर्वीही या ठिकाणी अपघात घडले असल्याने या मार्गावरील धोका अधिकच वाढला आहे. एकीकडे हा मार्ग आधीच धोकादायक असताना संबंधित विभागाकडून खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणच्या खड्ड्यांची तातडीने डागडुजी करून मोरी परिसरातील रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg