loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड किल्ला येथे गोवा बनावटीची ११ हजार ७०० रुपये किमतीची दारू जप्त; एकाला अटक

देवगड (प्रतिनिधी) - देवगड किल्ला परिसरातील मुस्लिमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बेकायदा गोवा बनावटीची दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. या कारवाईत ११ हजार ७५० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूच्या ९४ बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. या प्रकरणी संशयित शिवदास श्यामसुंदर पारकर (वय ४५, रा. विठ्ठलवाडी, देवगड) याच्याविरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५४/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी देवगड किल्ला परिसरात कारवाईसाठी गेले असता, संशयित पारकर याच्याकडे एका पांढऱ्या रंगाच्या गोणपाटाच्या पिशवीत गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये 'बॉब्स लेमन व्होडका' असे इंग्रजी लेबल असलेल्या १८० मिली क्षमतेच्या कंपनी सीलबंद ९४ बाटल्या मिळून आल्या. प्रत्येकी १२५ रुपये याप्रमाणे या दारूची एकूण किंमत ११ हजार ७५० रुपये आहे.

टाईम्स स्पेशल

बेकायदा विनापरवाना दारूचा साठा विक्रीच्या उद्देशाने ताब्यात बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश अर्जुन ओटवणेकर यांनी फिर्याद दिली. पोलीस हेडकॉन्स्टेबल देसाई, गावडे व तवटे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास देवगड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल लाड करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg