loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरवण येथे वनराई बंधारा, माजी सरपंच, महिलांचा पुढाकार

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हयात झालेला कमी पाऊस दुष्काळ या पार्श्वभूमीवर पुढील काही महिन्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे. यासाठी असलेले पाणी जमीनीत साठवून ठेवण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील गावागावात नदी नाले ओढे याना बंधारे बांधले जात आहे. तेरवण मेढे गावच्या माजी सरपंच मनिषा मनोहर गवस यांनी इतर महिलांना सोबत घेऊन तेरवण गेळये नदी येथे वनराई बंधारा बांधला, यात अनेक महिला सहभागी झाल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तेरवण गेळये नदी पाञात वनराई बंधारा बांधण्यासाठी माजी सरपंच मनिषा मनोहर गवस, प्रतिक्षा सावंत, ईश्वरी गवस, नंदीनी गवस, शुभांगी गवस, सुमित्रा गवस, प्राजक्ता गवस, नामदेव गवस, प्रियांका गवस इतर महिला उपस्थित होत्या. एक दिवस पूर्ण श्रमदान करून बंधारा बांधला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg