loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण नगरपालिकेच्या उपमुख्याधिकारीपदी अनंत मोरे यांची नियुक्ती; सोमवारपासून स्वीकारणार पदभार

चिपळूण (संतोष पिलके): चिपळूण नगर पालिकेच्या उपमुख्याधिकारीपदी अनंत मोरे यांची नियुक्ती झाली असून, येत्या सोमवारपासून ते या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. यामुळे आता चिपळूण नगर पालिकेला दोन उपमुख्याधिकारी लाभणार आहेत. चिपळूण तालुक्यातील कापरे गावचे सुपुत्र असलेल्या अनंत मोरे यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे पुन्हा चिपळूण नगरपालिकेत आगमन होत आहे. अनंत मोरे यांना प्रशासकीय कामकाजाचा चांगला अनुभव असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क ही देखील त्यांची जमेची बाजू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापूर्वी त्यांनी चिपळूण नगरपालिकेत कार्यालयीन अधीक्षक म्हणून काम पाहिले होते. या कार्यकाळात त्यांनी शहरातील विकासात्मक कामे, विविध नागरी समस्या, नागरिकांचे प्रश्न आणि प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आपल्या कर्तव्यनिष्ठ कार्यपद्धतीमुळे आणि प्रशासकीय कामकाजातील अनुभवामुळे त्यांची एक जबाबदार अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पुणे येथील फुरसुंगी नगर परिषदेत उपमुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. आता पुन्हा चिपळूण नगरपालिकेत उपमुख्याधिकारी म्हणून ते रुजू होत असल्याने शहरातील प्रलंबित नागरी प्रश्न आणि प्रशासकीय कामकाजाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

सध्या चिपळूण नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून संजय जाधव तर उपमुख्याधिकारी म्हणून प्रमोद ठसाळे हे उपमुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जोडीला आता त्यांचे जुने सहकारी अनंत मोरे हे देखील सोमवारपासून उपमुख्याधिकारी म्हणून रुजू होणार असल्याने प्रशासकीय कामकाजाला आता आणखी गती मिळणार आहे. अनंत मोरे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg