loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरात चोरांचा सुळसुळाट; बंद घरे लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात चोरांचा सुळसुळाट असून, बंद घरांना लक्ष्य करून चोर्‍या करण्याचे प्रमाण वाढले आहे. लागोपाठ घडणार्‍या या चोरीच्या घटनांमुळे लांजा शहरात सध्या प्रचंड भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक काही कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरटे बंद घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश करत आहेत. घरातील मौल्यवान ऐवज, दागिने आणि रोकड लंपास करण्याचे सत्र सुरू आहे. चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे नागरिकांना आता आपली घरे बंद करून बाहेर जाणेही धोक्याचे वाटू लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील मुख्य वस्त्यांमध्ये आणि गजबजलेल्या भागातही चोरटे खुलेआम चोर्‍या करत असल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम्ही घरात असतानाही सुरक्षित आहोत का? अशी भीती आता सामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. लांजात चोरट्यांनी डोके वर काढल्याने शहरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि या अज्ञात चोरट्यांचा छडा लावून त्यांना तात्काळ गजाआड करावे, जेणेकरून शहरातील भीतीचे वातावरण दूर होईल, अशी मागणी लांजावासीयांकडून होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg