loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदारांच्या तंबीलाही ठेकेदाराने दाखवली केराची टोपली! कोनाळकट्ट्यानंतर वायंगणतडमध्येही तोच प्रताप; व्हायब्रेटरशिवाय काँक्रीटीकरण!

तिलारी (प्रतिनिधी) : रस्ता जनतेच्या सोयीसाठी बांधायचा की ठेकेदाराच्या मनमानीसाठी? असा संतप्त सवाल आता वायंगणतडमधील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. दोडामार्ग तालुक्यात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामाचा दर्जा पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. वायंगणतड येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात आवश्यक व्हायब्रेटरचा वापर न करताच काँक्रीटीकरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, हा काही पहिलाच प्रकार नाही. अवघ्या दोन दिवसांपूर्वी कोनाळकट्टा येथेही याच ठेकेदाराच्या कामात व्हायब्रेटर वापरला जात नसल्याने संतप्त स्थानिकांनी थेट काम बंद पाडले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यावेळी पुन्हा अशी चूक होणार नाही, योग्य दर्जाचे काम केले जाईल, अशी हमी ठेकेदाराने दिली. ग्रामस्थांनीही विश्वास ठेवून काम पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, या विश्वासाला अवघ्या दोन दिवसांत तडा गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. आपल्यासाठी आमदार विकासकामे करतात, पण ठेकेदार मात्र ती लयास नेतात, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आम्ही आमदारांची भेट घेवून कैफियत मांडणार आहोत, असे ग्रामस्थांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

कोनाळकट्टा येथील घटनेतून ठेकेदाराने कोणताही धडा घेतला नाही का? स्थानिकांनी काम बंद पाडल्यानंतर दिलेली हमी केवळ वेळ मारून नेण्यासाठी होती का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. एकाच ठेकेदाराकडून दोन ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी समोर येत असल्याने त्याच्या कामकाजाच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg