loader
Breaking News
Breaking News
Foto

मालिश करुन देण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरली, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

सावंतवाडी - मालिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या गळ्यातील तीस हजार रुपये किंमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना पारपोली गावठणवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित हा दुचाकीवरून पारपोली गावठणवाडी येथे फिर्यादी रमेश परब यांच्या घरी गेला. तिथे त्याने वयोवृद्ध पत्नी यांच्या पायाची मालिश करून देण्याच्या बहाण्याने गळ्यातील सोन्याची चैन बाजूला कागदात काढून ठेवण्यास सांगितली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालिश करून झाली असता जाताना तो कागद घेऊन पलायन केले. फिर्यादी यांनी शोधाशोध केली असता सोन्याची चैन आढळून आली नाही. याबाबत फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. ३० हजार रुपयांचा हा सोन्याचा ऐवज आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत. अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. घरोघरी वस्तू अथवा मालिश करण्याच्या बहाण्याने फिरणार्‍या कोणत्याही अनोळखी इसमाकडून मालिश करून घेऊ नये, असे आवाहन सावंतवाडी पोलिसांनी केले आहे. अधिक तपास पो दिपक शिंदे करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg