loader
Breaking News
Breaking News
Foto

कराटे स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील कराटे स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत शाळेच्या शुभम सचिन भंडारे याने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. तर वेदांत प्रसाद देवाडीगा याने द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण सराव यांचा महत्वाचा वाटा आहे. यामध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक दिपक कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg