loader
Breaking News
Breaking News
Foto

येगाव परिसरात कॅनॉलजवळ पटेरी वाघ व पिल्ले दिसल्याने खळबळ; वनविभागाने दिली शाळेला भेट, कॅमेरे बसवणार!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - येगाव बौद्धवाडी व कुरपणवाडी परिसरातील कॅनॉलजवळ, मुख्य रस्त्याच्या कडेला सकाळी ९ च्या सुमारास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पटेरी वाघ आपल्या पिल्लांसह फिरताना दिसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा शालेय वेळेतच वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विद्यार्थ्यांनी ही माहिती तात्काळ शिक्षकांना व स्थानिक ग्रामस्थांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी सावर्डे वनक्षेत्रपाल सुरेश उपरे व साहाय्यक अश्विनी जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तातडीने माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तत्परता दाखवत जिल्हा परिषद आदर्श शाळा येगाव नंबर १ ला भेट दिली. यावेळी वनक्षेत्रपाल उपरे यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीवांपासून घ्यावयाची काळजी व सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. तसेच वनअधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून आणि वन्यजीवांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी या संवेदनशील परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्याचे आश्वासन वनविभागातर्फे देण्यात आले. ग्रामस्थांनीही सकाळ -संध्याकाळच्या वेळी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या प्रसंगी माजी सरपंच सचिन चव्हाण, ग्रामसेवक शंतनू अय्यर, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन चव्हाण, विजय नाचरे, सामाजिक कार्यकर्ते अजित जाधव, शाळेचे मुख्याध्यापक संजय घाग, शिक्षिका वर्षा होडे, शिक्षक विनायक तांदळे, तलाठी नारायण कणसे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. तत्परतेने दखल घेऊन घटनास्थळी धाव घेतल्याबद्दल उपस्थित सर्वांच्या वतीने वनक्षेत्रपाल सुरेश उपरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg