देवगड (प्रतिनिधी) - पोयरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत झालेल्या महिला मारहाण प्रकरणाला आता महत्त्वपूर्ण न्यायालयीन वळण मिळाले आहे. या प्रकरणात विद्यमान सरपंच गीता गणपत राणे, उपसरपंच दिव्या दीपक मेस्त्री, महिला सदस्य अनुजा अनिल रुपये, माजी सरपंच समीक्षा संदीप घाडी, माजी सरपंच संदीप जयवंत घाडी, माजी सरपंच भरत सदाशिव राणे यांच्यासह इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देवगड न्यायालयाने दिले आहेत. दि. २१ मे २०२६ रोजी पोयरे ग्रामपंचायतीच्या नियोजित ग्रामसभेदरम्यान एका ५९ वर्षीय महिलेला मारहाण, सार्वजनिक ठिकाणी विनयभंग, शिवीगाळ तसेच दागिने हिसकावल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर संबंधित महिलेने देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात केवळ अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद केली होती.
गंभीर स्वरूपाच्या आरोपांनंतरही नियमित एफआयआर दाखल न झाल्याने संबंधित महिलेने न्यायालयात धाव घेत बीएनएसएस कलम १७३ व १७५(३) अंतर्गत अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने तसेच पोलिसांनी अर्ज फेटाळण्याबाबत घेतलेले आक्षेप न्यायालयाने फेटाळून लावत अर्ज मंजूर केला. न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे संबंधित महिलेला मारहाण करणे, सार्वजनिक ठिकाणी तिच्या विनयभंगासदृश कृत्य करणे, शिवीगाळ करणे आणि तिचे दागिने हिसकावणे यांसारखे दखलपात्र गुन्हे घडल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदवले. त्यामुळे या प्रकरणात सखोल पोलीस तपास होणे आवश्यक असल्याचे नमूद करत देवगड पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले.
या आदेशामुळे ग्रामसभेतील कथित मारहाण प्रकरणात आता नियमित पोलीस तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या विद्यमान पदाधिकार्यांसह माजी लोकप्रतिनिधींची नावे तक्रारीत आरोपी म्हणून नमूद आहेत. ग्रामसभेसारख्या लोकशाहीच्या महत्त्वपूर्ण व्यासपीठावर घडलेल्या कथित घटनेची आता पोलिसांकडून सखोल चौकशी होणार असून, या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे पोयरेसह संपूर्ण देवगड तालुक्याचे लक्ष लागले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.