loader
Breaking News
Breaking News
Foto

पाण्यात अभावी जळालेल्या भातशेतीची पाहणी; सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानंतर सावंतवाडी परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. सावंतवाडी शहराच्या सीमेवर असलेल्या झिरंगवाडी, गरड आणि माजगावसह आसपासच्या विविध गावांतील बऱ्याच शेतकऱ्यांची भातशेती पाण्याअभावी पूर्णपणे कोरडी पडली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन जळालेल्या भातशेतीची व बागायतींची बारकाईने पाहणी केली. पावसाच्या ओढीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या संकटसमयी भारतीय जनता पक्ष पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी बाधित शेतकऱ्यांना दिला. ​या पाहणी दौऱ्यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, विजय साटेलकर यांच्यासह भाजपचे प्रमुख कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg