loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २ कोटी ६७ लाखांचा आराखडा मंजूर, १३७ कामांचा संभाव्य आराखड्यात समावेश

​रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची आखणी करण्यात आली आहे. सन २०२६-२७ या आगामी आर्थिक वर्षासाठी तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींमधील ७४ गावे आणि १३७ वाड्यांसाठी तब्बल २ कोटी ६७ लाख रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.​मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२५-२६ च्या टंचाई आराखड्यामध्ये तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींपैकी ४३ ग्रामपंचायतींचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये एकूण १०० इतक्या वाडीवस्त्यांचा समावेश होता. सन २०२५-२६ या वर्षात विविध उपाययोजनांवर १ कोटी ४७ लाख ५० हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. यामध्ये विंधन विहिरी, टँकरने पाणीपुरवठा, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती आणि विहीर अधिग्रहण यांसारख्या ७२ कामांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कामांपैकी विंधन विहिरीची १४ कामे, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग रत्नागिरी यांच्याकडे सादर केलेल्या ४ प्रस्तावांना मंजुरी मिळून ती कामे पूर्णत्वाच्या टप्प्यावर आली आहेत. उर्वरित कामे जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ​१० गावे आणि ३९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा.. सन २०२५-२६ च्या उन्हाळी हंगामात तालुक्यातील एकूण १० गावे आणि ३९ वाड्यांमध्ये तीव्र टंचाई निर्माण झाली होती. या बाधित भागातील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यासाठी प्रशासनाकडून १४७.५० लाख रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली होती, ज्यापैकी एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत ५४.६० लाख रुपये खर्च झाले आहेत.

टाईम्स स्पेशल

उन्हाळ्यातील टंचाईची तीव्रता लक्षात घेता, आगामी सन २०२६-२७ साठी १५ ग्रामपंचायतींमधील १३५ वाड्यांमधून विविध उपाययोजनांसाठी मागण्या प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पंचायत समितीने १३७ कामांचा संभाव्य आराखडा तयार केला आहे. ​यामध्ये प्रामुख्याने: ​विंधन विहिरी: २० गावांतील २० कामांसाठी ४० लाख रुपये. ​टँकरने पाणीपुरवठा: १५ गावांतील ७० कामांसाठी ६० लाख रुपये. ​विंधन विहीर दुरुस्ती: १० कामांसाठी १० लाख रुपये. ​न.पा. पाणीपुरवठा योजना दुरुस्ती: १० कामांसाठी १०० लाख (१ कोटी) रुपये. ​विहीर अधिग्रहण: १५ गावांतील ५० कामांसाठी ५० लाख रुपये. ​गाळ काढणे व इतर कामे: ५ लाख आणि ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व उपाययोजनांमुळे आगामी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg