loader
Breaking News
Breaking News
Foto

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत चोरवणे शाळेचे यश

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक व पूर्ण प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित विविध तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये जि. प. शाळा चोरवणे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी हा लहान गट, तर इयत्ता सहावी ते आठवी हा मोठा गट अशा दोन गटांत विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चोरवणे शाळेच्या आराध्या शशिकांत गीते हिने चित्रकला स्पर्धेतील मोठया गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर निबंध स्पर्धा (मोठा गट) यामध्ये आर्वी राजेंद्र पडिलकर हिने द्वितीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या वतीने सर्व यशस्वी स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg