loader
Breaking News
Breaking News
Foto

वावघर-भागणेवाडी-भोईवाडी जेटी रस्त्याची दुरवस्था; तातडीने सुधारणा करण्याची गरज

दापोली (प्रतिनिधी) - वावघर, भागणेवाडी आणि भोईवाडी परिसरातील नागरिकांसाठी तसेच मच्छीमार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जेटीकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून मोठाले दगड रस्त्यावर आल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची सुधारणा करणे गरजेचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रस्त्यावरून दररोज मच्छीमार व्यावसायिक, शालेय विद्यार्थी, महिला आणि वयोवृद्ध नागरिक ये-जा करतात. खराब रस्त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवणे कठीण झाले असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा इतर वाहने गावात आणताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच जेटीवर मासेमारी साहित्य आणि मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.

टाईम्स स्पेशल

पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल होत असल्याने पायी चालणेही मुश्कीलीचे होते. वावघर भोईवाडीतील स्थानिक रहीवाशांसह भागणेवाडीतील रहिवाशांची भातशेती याच मार्गावर असल्याने शेतीविषयक कामांसाठी साहित्य ने आण करण्यासाठी हा एकमेव असलेला रस्ता आवश्यक आणि महत्त्वाचा असा रस्ता आहे त्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्याच्या समस्येची दखल घेऊन संबंधित बांधकाम विभागाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन. वावघर-भागणेवाडी-भोईवाडी जेटी रस्त्याच्या डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम तातडीने हाती घ्यायला हवे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg