loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण तालुका हिंदी शिक्षक संघटनेच्या वतीने हिंदी पंधरवडा, राष्ट्रभाषा हिंदी दिवस सांगता समारंभ

चिपळूण (संतोष पिलके): चिपळूण तालुका हिंदी शिक्षक संघटना, चिपळूण तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग, चिपळूण नगर परिषद, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिपळूण चिपळूण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रभाषा हिंदी पंधरवडा सांगता समारंभ गुरुवार दि.२४/९/२६ रोजीर चिपळूण युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष विद्यमान सल्लागार अनिलकुमार जोशी सर होते. प्रमुख उपस्थित अतिथी धीरज धारवी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रबंधक चिपळूण, अमोल तारी शाखा प्रबंधक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा प्रबंधक संजय जाधव मुख्यधिकारी चिपळूण, मंगेश पेढांबकर उपमुख्यधिकारी चिपळूण नगरपरिषद, मिलिंद कडवईकर रत्नागिरी जिल्हा हिंदी शिक्षक संघटना अध्यक्ष, प्रा. युवराज जाधव डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालय मार्गताम्हाणे, चिपळूण नगर परिषद उद्यान विभाग प्रमुख साडविलकर, संजय चव्हाण उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघटना, कल्पेश दळवी, सहसचिव मुख्याध्यापक संघटना रत्नागिरी जिल्हा, संजय बनसोडे मुख्याध्यापक युनायटेड इंग्लिश स्कूल, श्रीमती रेवती कारदणे उपमुख्याध्यापिका यु. ई स्कूल चिपळूण, मान्यवर अतिथी होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रारंभी यु. ई स्कूल च्या विद्यार्थिनींनी “ज्योत से ज्योत जलाओ प्रेम गंगा बहाते चलो” सुरेख आवाजात सादर केले. सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अनिलकुमार जोशी, नगर परिषदचे मुख्याध्याधिकारी संजय जाधव यांनी घालून अभिवादन केले. दीपप्रज्वलन अनिलकुमार जोशी, अमोल तारी धीरज धारवी मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, जिल्हा हिंदी शिक्षक संघटना अध्यक्ष मिलिंद कडवईकर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक व स्वागत चिपळूण तालुका हिंदी शिक्षक संघटना अध्यक्षा मानसी पेढांबकर यांनी केले. सर्व अतिथीचा सन्मान शाल, फुल झाडांची रोपे देऊन राजश्री लोखंडे, मुग्धा पवार, मानसी पेढांबकर, नागेश सर, पवार सर, राजेश माळी यांच्या हस्ते करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

चिपळूण तालुका हिंदी शिक्षक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ५ वी ते ८ वी छोटा गट कविता, गायन स्पर्धा, मोठा गट नववी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी हिंदी साहित्यकारांचे जीवन, इ.१० वी मार्च २०२६ मध्ये झालेल्या बोर्डाच्या हिंदी परीक्षेत ९० पेक्षा अधिक अंक प्राप्त करणारे विद्यार्थी, संयुक्त हिंदी ४५ पेक्षा अधिक मिळविलेल्या विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष हिंदी विषयाचे काम करणारे हिंदी शिक्षकांना प्रमाणपत्रे, सन्मान चिन्हे देऊन अनिल कुमार जोशी, संजय बनसोडे, मिलिंद कडवईकर, संजय चव्हाण व अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मान्यवर मुख्याधिकारी संजय जाधव, भारतीय स्टेट बँक शाखा प्रबंधक अमोल तारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रबंधक धीरज धारवी जिल्हा हिंदी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद कडवईकर, संजय चव्हाण, उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघ यांनी हिंदी भाषेचे आवश्यकता महत्त्व अनिलकुमार जोशी सर यांनी हिंदी भाषेसाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg