loader
Breaking News
Breaking News
Foto

धाकोरे येथे वनराई बंधाऱ्यांच्या कामाला ग्रामस्थांचे सहकार्य

सावंतवाडी : सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, ग्रामस्थांच्या सहकार्याने वनराई बंधारे बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. धाकोरे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील नदी व ओहोळांवर वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. या माध्यमातून पाण्याचा साठा वाढवून भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी धाकोरे ग्रामस्थ एकवटले आहेत. या कामात पुरुषांसोबत महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळत असून, बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

धाकोरे गावात किमान २० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी नितीन परब यांनी दिली असून आतपर्यंत चव्हाटवाडी,नाईकवाडी (सार्वजनिक विहीर) या ठिकाणी बंधारे बांधून पूर्ण झाले असून,पुढील बंधाऱ्यांची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी धाकोरे पोलीस पाटील श्रीराम प्रभुराळकर, ग्रामपंचायत अधिकारी नितीन परब, माजी उपसरपंच सिताराम गावकर, जयवंत मुळीक, हरेश कोठावळे, ग्रामसखी अपर्णा प्रभुराळकर, ग्रामसंघ सचिव सुगंधा ठाकूर, अंगणवाडी सेविका मनाली साटेलकर, अपर्णा राळकर, सुहास साटेलकर, योगेश गावकर तसेच, बचत गट सदस्य, सिरापी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg