loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळणेश्वर येथे १७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सवाचे आयोजन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - श्री देव वेळणेश्वर प्रसन्न आणि श्री दुर्गामाता प्रसन्न... श्री स्वयंभू विकास मंडळ वेळणेश्वर तर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही पाच दिवसीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. शनिवार दि. १७ ऑक्टोबर २०२६ ते बुधवार दि. २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. ग्रामस्थ आणि भाविकांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या उत्सवाचा नित्य कार्यक्रम असा आहे - शनिवार दि. १७ रोजी सकाळी ९ वा. मिरवणुकीने दुर्गामातेचे आगमन, १० वा. प्राणप्रतिष्ठापना पूजा, सायं. ६ वा. आरती, रात्री ८ वा. फनी गेम्स आणि ९ वा. दांडिया. रविवार आणि सोमवारी सकाळी ७ वा. पूजा व आरती, सायं. ६ वा. आरती, रात्री फनी गेम्स व दांडिया. मंगळवारी दि. २० रोजी सकाळी ९ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी ३ वा. माता-भगिनींसाठी हळदी-कुंकू आणि रात्री ९ वा. तालुकास्तरीय फॅन्सी ड्रेस स्पर्धा व दांडिया. तर बुधवारी दि. २१ रोजी सकाळी ११ वा. आरतीनंतर सायं. ५ वा. मिरवणुकीने विसर्जन होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उत्सवात तालुकास्तरीय फॅन्सी ड्रेस स्पर्धा लहान व मोठा गट अशा दोन गटात होणार असून, फनी गेम्स देखील दोन गटात होतील आणि प्रत्येक गटात दोन नंबर काढून चषक देण्यात येणार आहे. महिलांसाठी संगीतखुर्ची स्पर्धा होऊन आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या उत्सवाचे व्यवस्थापक श्री स्वयंभू विकास मंडळ वेळणेश्वर व ग्रामस्थ मंडळी वेळणेश्वर असून, स्थळ कै. श्री. वामनकाका जोशी यांचे भव्य पटांगण, वेळणेश्वर हे आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg