loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये ‘नमो दांडिया’ २०२६ चा जल्लोष; बॉम्बे हूपर शिवानी धोपावकरच्या परफॉर्मन्सने जिंकली मने

खेड - भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो दांडिया’ २०२६ या नवरात्रोत्सव कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरल्या बॉम्बे हूपर शिवानी धोपावकर. त्यांनी आपल्या दमदार आणि आकर्षक परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. आपल्या खास शैलीत सादरीकरण करत त्यांनी नागरिकांसोबत दांडिया खेळण्याचा आनंदही घेतला, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमस्थळ जल्लोषात दुमदुमून गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजपा नेते तथा खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर आणि भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या पुढाकाराने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खेड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महिला, युवती, तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांनी दांडियाच्या तालावर ठेका धरत नवरात्रोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.

टाईम्स स्पेशल

शिवानी धोपावकर यांनी नागरिकांशी संवाद साधत उत्सवातील आनंदात सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. भाजपा व राजवैभव प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे खेड शहरातील नागरिकांना नवरात्रोत्सव एकत्रितपणे साजरा करण्याची संधी मिळाली. ॲड. वैभव खेडेकर यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाने खेडच्या नवरात्रोत्सवाच्या उत्साहात अधिकच भर घातली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg