loader
Breaking News
Breaking News
Foto

खरवते येथे राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा क्रीडोत्साहाचा प्रारंभ

चिपळूण (संतोष पिलके) : विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात संघभावना, शिस्त आणि खिलाडूवृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, रत्नागिरी तसेच रत्नागिरी जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या वतीने खरवते येथे १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शालेय जीवनात खेळाला विशेष महत्त्व आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि सांघिक कामाची भावना निर्माण होते. राज्यस्तरीय स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखविण्याची, विविध भागांतील खेळाडूंशी खेळण्याची आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळविण्याची संधी उपलब्ध होते. या स्पर्धेच्या निमित्ताने युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळाले असून, अशा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात.

टाईम्स स्पेशल

या प्रसंगी मारुतीराव घाग, विजय शिंदे (क्रीडा अधिकारी), प्राचार्य सुनीतकुमार पाटील, सूर्यकांत खेतले, महेश घाग, जमीर अत्तार, संदीप उईके, प्रितम खोत, यशिका निकम, सिद्धार्थ निकम आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या क्रीडाप्रतिभेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनाही राज्यस्तरावर आपली क्षमता दाखविण्याची संधी मिळते. खरवते येथे आयोजित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम आणि खेळाविषयीचा उत्साह वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg