loader
Breaking News
Breaking News
Foto

तारकर्ली येथील रापण मासेमारीच्या दोन नौकांना भीषण आग लागल्याने एकच खळबळ

मालवण( प्रफुल्ल देसाई) :तारकर्ली येथील रापण मासेमारीच्या दोन नौकांना आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या दोन नौका पैकी प्रथम एका नौकेला अचानक लागून ती जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर या आगीमुळे बाजूची दुसरी नौका देखील अर्धी जळाल्याने नुकसान झाले आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तारकर्ली येथील नरेश कांदळगावकर व गुंडू कांदळगावकर यांच्या या रापण नौका असून नौका आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने रापण व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी स्थानिक मच्छिमार व ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आगीवर नियंत्रण मिळविले ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. या रापण संघामध्ये शंभर पेक्षा जास्त मच्छिमार कार्यरत असून नौकेला आग लागल्याने त्यांचा रापण व्यवसाय धोक्यात आला आहे. ८ वर्षापूर्वी देखील कांदळगावकर यांच्या नौकेला आग लागल्याची घटना घडली होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg