loader
Breaking News
Breaking News
Foto

कापरे येथे श्री देव नागार्जुन मंदिरात ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सवाचे आयोजन

चिपळूण (संतोष पिलके) : तालुक्यातील कापरे येथील श्री देव नागार्जुन मंदिर ट्रस्ट (मोरे निमाई) यांच्या वतीने रविवार, दि. ११ ऑक्टोबर ते मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी घटस्थापना करून ग्रामदेवतेची रूपे लावण्यात येणार आहेत.रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी देवीसाठी बलिदानाचा कार्यक्रम होईल. तर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या निमित्ताने सोनं लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम आणि नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी सर्वांनी मंदिरात हजर राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

उत्सवातील महत्त्वाचे कार्यक्रम रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ ते मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ : दररोज संध्याकाळी ७ वाजता महारती व प्रसाद, नवरात्रोत्सवासाठी भाविकांच्या सोयीसाठी खणा-नारळ व ओटीची व्यवस्था मंदिरामध्ये करण्यात आली आहे. भक्तिभाव, श्रद्धा आणि पारंपरिक उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या नवरात्रोत्सवात परिसरातील भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव नागार्जुन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg