loader
Breaking News
Breaking News
Foto

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आयडॉल शिक्षक आनंदा बामणीकर यांचा गौरव

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक आनंदा लक्ष्मण बामणीकर यांचा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आयडॉल शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर, कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक कोळेकर, सिंधुदुर्ग डायटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांच्यासह माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बामणीकर यांनी अध्यापन कार्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृतियुक्त शिक्षण, शैक्षणिक नवोपक्रम, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, क्रीडा विकास आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची आयडॉल शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आनंदा बामणीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालेला हा गौरव दोडामार्ग तालुक्यासह शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी या संस्थेसाठी अभिमानाचा क्षण ठरला.

टाईम्स स्पेशल

आनंदा बामणीकर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश बाबू नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक आणि खजिनदार सी. एल. नाईक, मुख्याध्यापक संजय पाटील, गटशिक्षणाधिकारी नदाफ, केंद्र प्रमुख अंजली जोशी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने अभिनंदन करताना बामणीकर यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर झालेली दखल ही संस्थेसाठी गौरवास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार व्यक्त करण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील शिक्षकाचा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालेला हा सन्मान शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची पावती असून, या सन्मानामुळे दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg