दापोली, : दापोली शहरातील अनेक वर्षांपासून व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या खोकेधारक, फेरीवाले व छोट्या व्यावसायिकांवर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांची भेट घेऊन या संपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कालपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या व्यावसायिकांसमोर निर्माण झालेली अडचण संघाच्या वतीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावेळी विकासकामांना विरोध नसून, विकासाच्या प्रक्रियेत सामान्य व्यावसायिकांची रोजीरोटी आणि त्यांच्या कुटुंबांचे भविष्य सुरक्षित राहिले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली.
युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाच्या वतीने प्रशासनाकडे मागणी करण्यात आली की, शासनाच्या लागू नियम व फेरीवाला धोरणानुसार पात्र फेरीवाले व छोट्या व्यावसायिकांचे सर्वेक्षण करून, त्यांच्यासाठी हॉकर्स झोन अथवा कायद्यानुसार उपलब्ध असलेल्या योग्य पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात यावी. अनेक वर्षांपासून व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना अचानक व्यवसायापासून वंचित न करता त्यांना कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करता येईल अशी व्यवस्था नगरपंचायतीने निर्माण करावी. यावेळी संघाच्या वतीने प्रशासनासमोर अत्यंत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली की, जर शहराच्या विकासासाठी एखाद्या ठिकाणी कारवाई किंवा स्थलांतर करणे आवश्यक असेल, तर प्रथम संबंधित व्यावसायिकांच्या व्यवसायाची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी आणि त्यानंतरच त्यांचे स्थलांतर करण्यात यावे. कारण या छोट्या व्यवसायांमागे केवळ एक व्यक्ती नसून त्यांचे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे. व्यवसाय अचानक बंद झाल्यास कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो आणि अनेक कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट येऊ शकते. त्यामुळे विकासही हवा आणि रोजगारही हवा, या भूमिकेतून प्रशासनाने दोन्हींचा समतोल साधावा, अशी विनंती करण्यात आली.
यावर नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत, अशा प्रकारे हंगामी स्वरूपात स्थानिक गावठी उत्पादनांची विक्री करणार्या महिला व शेतकर्यांवर अन्यायकारक कारवाई केली जाणार नाही, असा सकारात्मक शब्द दिल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले. या भेटीमुळे दापोलीतील खोकेधारक, छोटे व्यावसायिक, महिला व स्थानिक शेतकरी यांच्यामध्ये आपल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याची भावना निर्माण झाली असून, प्रशासनाकडून सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या बैठकीस युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर, सल्लागार अनिल तांबे, महाराष्ट्र सचिव श्रीकांत सकपाळ, वकील संदेश मोरे, दापोलीतील ज्येष्ठ नागरिक अनिल खोत, समाजसेवक अरविंद महाडिक, उपाध्यक्ष विजयराव पवार, उपाध्यक्ष वजुद्दीन परकार, वहिद कडवेकर, युवा तालुका उपाध्यक्ष नवनाथ काते, वारिस तांबे, अनिल जाधव, प्रदीप गमरे, दीपक मासेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.