loader
Breaking News
Breaking News
Foto

सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या नहुष पारगावकरचे जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत यश

सावंतवाडी (प्रतिनिधी) - इंडियन ऑईल पुरस्कृत तसेच महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा १४ व १५ नोव्हेंबर रोजी मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉलमध्ये उत्साहात झाल्या. या स्पर्धेत ११ ते १३ वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट्रल इंग्लिश स्कूल, सांवतवाडी शाळेच्या नहुष नंदकिशोर पारगावकर याने विजेतेपद पटकावले. त्याला प्रमाणपत्र, चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका मारिया आल्मेडा व त्याचे टेबल टेनिसचे प्रशिक्षक नितीन तळेकर यांनी मार्गदर्शन केले. सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी नहुष याचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg