loader
Breaking News
Breaking News
Foto

अनेक देशांचे राजकारण हादरवून सोडणारा लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याबद्दल एकामागून एक धक्कादायक खुलासे!

वॉशिंग्टन: पुन्हा जगभरात खळबळ उडाली आहे.केवळ अमेरिकाच नव्हे तर जगातील अनेक देशांचे राजकारण हादरवून सोडणारा लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याबद्दल एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत.ताज्या खुलाशात या लैंगिक गुन्ह्यातील दोषीबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे की, त्याने आपली प्रतिमा सुधारण्याच्या प्रयत्नात रशियातील अनेक महिलांना आपल्या जाळ्यात अडकवले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एका तपासातून असे दिसून आले आहे की, लैंगिक गुन्ह्यातील दोषी जेफ्री एपस्टीनने 2008 मध्ये दोषी ठरवल्यानंतर, जगातील उच्चभ्रू लोकांमध्ये (elite) आपली पत पुन्हा निर्माण करण्याच्या प्रयत्नात रशिया आणि पूर्व सोव्हिएत देशांमधून महिलांना आपल्या जाळ्यात अडकवणे सुरूच ठेवले. या दरम्यान त्याने देशातील श्रीमंत व्यापारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही आपले संबंध प्रस्थापित केले.

टाइम्स स्पेशल

रशिया आणि पूर्व सोव्हिएत देशांतील किमान 17 महिलांना या सेक्स-ट्रॅफिकिंग नेटवर्कमध्ये सामील करण्यात आले होते. एपस्टीनच्या रशियन संपर्कांची माहिती असलेल्या दोन डझनहून अधिक लोकांच्या मुलाखती आणि शेकडो पानांच्या कागदपत्रांच्या समीक्षेच्या आधारे वृत्तसंस्था रॉयटर्सने ही माहिती समोर आणली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg