loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे स्वरूप योगिनी 2026 पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ, पावसतर्फे अध्यात्म मंदिर, रत्नागिरी येथे दरवर्षी समाजामध्ये निस्वार्थी, निरलसपणे कार्य केलेल्या कर्तृत्वान स्त्रियांना स्वरूपयोगिनी पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारांचे हे सहावे वर्ष आहे. रविवार दि. 11 ऑक्टोबर रोजी सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, सोमवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सौ. माधुरी कळंबटे व मंगळवार दि. 13 ऑक्टोबर रोजी उमा देवळे यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रतिभा प्रभुदेसाई या शिक्षिका असून सेवानिवृत्तीनंतर निरपेक्ष भावनेने आपल्याच “संतुलन “या केंद्रामार्फत एक तप अविरत कार्यरत आहेत. माधुरी कळंबटे या एक उद्योजिका असून नरबे येथे त्यांचे पती प्रतिक कळंबटे यांचेबरोबर नर्सरी उद्योग आहे. विशेष करुन दरवर्षी जवळपास लाख ते दीड लाख सोनचाफ्याच्या कलमांची विक्री करतात. उमा देवळे या उद्योजिका असून ऑटोमोबाईल लॅम्प या कारखान्यात आपल्या पतीसमवेत कार्यरत आहेत. आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात त्या अग्रेसर आहेत.

टाईम्स स्पेशल

तसेच या तिन्ही दिवशी सायली गोडबोले - जोशी यांचे महाभारतातील स्त्री पर्व या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी या स्वरूप योगिनी पुरस्कार सोहळ्याला व व्याख्यानाला आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg