loader
Breaking News
Breaking News
Foto

गुडेघर येथील चर नदिपात्रात ग्रामस्थांनी बांधला श्रमदानाने बंधारा

मंडणगड (प्रतिनिधी) : गुडेघर गावातील चर स्थानिक ठिकाणाचे नाव असलेल्या नदीपात्रातील ठिकाणी ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानाने वनराई बंधारा बांधला आहे. ग्रामीण भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी हा लोकसहभागाचा उपक्रम राबवला गेला. यासाठी उमरोली ग्रुप ग्राम पंचायतीचे ग्राम पंचायत अधिकारी घनश्याम व्हरकुटे, गुडेघर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष वसंत शिगवण, उपाध्यक्ष मनोज वैराग, सचिव दिपक कदम, उपसचिव सुनील लांजेकर, खजिनदार उदय तांबिटकर, गुडेघर मुंबई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शरद तांबिटकर व मुंबईकर, सल्लागार अंकुश कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गावातील सर्व ग्रामस्थांनी बंधारा बांधण्यासाठी आपले श्रमदानाने योगदान दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड तालुक्यातील गुडेघर येथील चर नदीच्या पात्रात पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीमेअंतर्गत पावसाळा संपल्यानंतर निर्माण होणारी पाण्याची टंचाई रोखण्यासाठी ग्रामस्थांनी "पाणी अडवा, पाणी जिरवा" हा संकल्प प्रत्यक्षात आणला. यासाठी गावातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये माती व रेती भरून हा बंधारा अत्यंत कमी खर्चात उभारला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची (बोअरवेल) पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून, गुरांच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटणार आहे. सरकारी मदतीची वाट न पाहता गावकऱ्यांनी स्वतःच्या हिंमतीवर हा जलसंधारणाचा यशस्वी प्रयोग करून इतर गावांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg