loader
Breaking News
Breaking News
Foto

२४ नोव्हेंबर रोजी आजगाव श्री वेतोबा वार्षिक जत्रोत्सव

आजगाव - आजगाव येथील ग्रामदैवत श्री देव वेतोबा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असून, देवाला नारळ व केळी ठेवण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी श्री मतकरीप्रभू आजगावकर यांच्या तुळशी वृंदावन विवाहाचा सोहळा पार पडणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रात्री श्री देव वेतोबा, रवळनाथ, पुरमार व महादेव यांच्या तुळशी विवाहासह दीपमाळ पूजन, तेलवाटप व दीपमाळांवर दिवे लावून आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच वेतोबा, रवळनाथ, पुरमार, आदित्यनारायण व महादेव या पाचही देवतांच्या मंदिरांभोवती पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रोषणाई, देवतांचे विवाहसोहळे, गाऱ्हाणे व केळीवाटप आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

टाईम्स स्पेशल

रात्री आजगावकर दशावतारी मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार असून, पहाटे दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. या वार्षिक जत्रोत्सवाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त गावकर मंडळी व आजगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg