loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा विठ्ठल मंदिरात काकड आरतीला आरंभ

बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात मंगळवारी दिवाळी पाडव्यापासून काकड आरतीला आरंभ झाला असून दररोज पहाटे श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. हा सोहळा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालतो. पहाटे पाच वाजता भूपाळी म्हणून काकड आरतीला प्रारंभ होतो. त्यानंतर तुपात भिजवलेल्या काकड्याच्या तेजस्वी ज्योतीने श्री विठ्ठल रखुमाईला ओवाळले जाते. यावेळी भजनकर्मी व भाविक पारंपारिक काकडा गीते म्हणतात. त्यानंतर पंचामृत अभिषेक होतो. यावेळी भजन सुरू असते. त्यानंतर महाआरती होते व सर्वांना तीर्थप्रसाद दिला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा सोहळा त्रिपुरारी पौर्णिमा मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर पर्यंत चालणार असून त्यादरम्यान शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी भागवत कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल मंदिराचा प्रतिवार्षिक जत्रोत्सव होणार आहे. दररोज पहाटे पाच वाजता मंगलमय वातावरणात होणाऱ्या या काकड आरती सोहळ्याला भजनकर्मी, भाविक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले यांसह सर्व स्तरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg