loader
Breaking News
Breaking News
Foto

पूर्णगड वासियांतर्फे भारती तायशेटे यांचा सत्कार

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - माजी विद्यार्थी संघ, शाळा व्यवस्थापन समिती, जि.प.आदर्श शाळा पूर्णगड नं.१, ग्रामस्थ पूर्णगड ता.जि. रत्नागिरी आयोजित भारती तायशेटे यांच्या शासकीय निवृत्ती पश्चात कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात मातोश्री सभाग़ह मेर्वी येथे संपन्न झाला. पदवीधर शिक्षिका, केंद्र मुख्याध्यापिका, प्रभारी केंद्र केंद्रप्रमुख अशा शिक्षण क्षेत्रातील विविध पदावर कार्यरत असलेल्या उपक्रमशील, उत्तम नेतृत्व गुण, सर्व गुणसंपन्न शिक्षिका वर्षा विजय जाधव उर्फ भारती मधुकर तायशेटे यांचा शासकीय सेवानिवृत्ती पश्चात कृतज्ञता सन्मान सोहळा व सदिच्छा समारंभ अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून नंदकुमार मुरकर शिक्षण सभापती जिल्हा परिषद रत्नागिरी, शिल्पाताई सुर्वे नगराध्यक्ष रत्नागिरी, स्वाती शिंदे पंचायत समिती सदस्या गावखडी गण, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक संदेश कडव मित्रपरिवार, यांच्या उपस्थितीत पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिपप्रज्वलनकरून ईशस्वतन, स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी पूर्णगड गावातील मान्यवर व समाजातील विविध स्तरातील लोकांनी मनोगते व्यक्त केली व तायशेटे यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमला शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, सर्व समित्या, गावातील पदाधिकारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला. पूर्णगडसारख्या एका गावाने एका शिक्षकांचा एकत्र येवून एवढा मोठा सत्कार करणे म्हणजेच तुमच्या कामाची पोच पावती आहे, असे उद्गगार सभापती नंदकुमार मुरकर यांनी काढले.

टाईम्स स्पेशल

तसेच आपण दिलेले प्रेम व आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्या भावी आयुष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील. असे उद्गगार तायशेटे यांनी काढले. या सपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव वाघे व राजेद्र रागणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनीच मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg