loader
Breaking News
Breaking News
Foto

धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नको , शिवसेना तुमच्या पाठीशी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

जालना, ता. ९ : दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याला पाठीशी उभं राहून धीर देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जालना जिल्ह्यातील मौजपुरी गावातल्या अंबादास तांगडे या शेतकऱ्याच्या घरी भेट दिली व कुटुबियांसमवेत भोजन केले. संकट मोठं आहे पण धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी मंत्री संजय शिरसाट, मंत्री उदय सामंत, खासदार संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, मराठवाडा युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, नगरसेविका दर्शना झोल- खोतकर माजी खासदार आनंद परांजपे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या कुटुबांसमवेत दिवाळी साजरी करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना दिले होते. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्याच्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकरी कुटुंबांना भेट देऊन त्यांच्यासोबत संवाद साधला होता. आज उपमुख्यमंत्री शिंदे हे जालना जिल्ह्यातील भिलपुरी गावात पोहोचले. त्यांनी या गावातील शेतकरी अंबादास तांगडे याच्या घरी भेट दिली. मंत्रिपदाचा शिष्टाचार बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तांगडे यांच्या झोपडीत कुटुबियांसमवेत जमिनीवर बसून भोजन केले. यावेळी त्यांनी तांगडे यांच्या मातोश्री व मुलांची विचारपूस केली.

टाइम्स स्पेशल

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १२ कलमी सवलती जाहीर केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम मदत म्हणून ५००० रुपये जमा केले आहेत. शिवसेनेकडूनही शेतकऱ्यांना दिवाळी शिधा वितरित करण्यात आला. आज तांगडे कुटुंबाची भेट घेतली. तांगडे यांच्या मुलीची उच्च शिक्षणाची आणि विवाहाची जबाबदारी शिवसेनेने घेतली, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह ठरले आहेत, त्यांचेही विवाह शिवसेना पक्ष सामूहिक विवाह सोहळ्यातून करेल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या पत्नींना २५ हजार शिलाई मशीन, मुलींना २५ हजार सायकल शिवसेनेने वितरित केले. जिथे संकट तिथे शिवसेना हे समीकरण बनले आहे. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, सरकार पाठीशी आहे. पुढचा पाऊस होईपर्यंत पिण्याचे पाणी, जनवारांना चारा, अन्नधान्याचे नियोजन करण्यामध्ये सरकारसोबतच शिवसेना पूर्ण ताकदीनं उतरेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg