loader
Breaking News
Breaking News
Foto

खोपी विभागस्तरीय विविध स्पर्धांमध्ये बिजघर नं.१ शाळेचे यश

खेड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या स्पर्धांतर्गत खोपी प्रभागस्तरीय वत्कृत्व व निबंध स्पर्धेमध्ये मोठ्या गटात शुभ्रा भगवान जंगम प्रथम तर लहान गटात शौर्य मंगेश मर्चंडे याने प्रथम क्रमांक मिळवला. त्याचबरोबर चित्रकला स्पर्धेमध्ये अनुष्का योगेश निकम हिने प्रथम क्रमांक मिळवत उज्वल यश संपादन केले. तर महिला सबलीकरण या विषयावर आधारित पथनाट्यात देखील बिजघर नं. एक शाळेने प्रथम क्रमांक मिळवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक शैलेश पराडकर, संदीप घाणेकर, विजय सकपाळ व मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. हेदली नं.१ शाळेत पार पडलेल्या या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून हेदली केंद्राचे केंद्रप्रमुख सदाशिव राठोड यांनी काम पाहिले. शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल खोपी विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी संदीप कंदूरकर, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg